निवळी येथून अंगणात पार्क केलेली दुचाकी लांबवली

0

रत्नागिरी : तालुक्यातील निवळी-मालपवाडी येथे अंगणात पार्क केलेली दुचाकी लांबवल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रमोद गोविंद आंबेकर (२०, रा. निवळी-मालपवाडी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी रात्री त्यांनी आपली दुचाकी (एमएच०८-वाय-८४२१) घराबाहेर अंगणात पार्क करुन ठेवलेली होती. मंगळवारी सकाळी दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी आजुबाजुला दुचाकीचा शोध घेतला असता ती न सापडल्याने त्यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली. याबाबत अधिक तपास पोहेकॉ झगडे करत आहेत

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:57 AM 16-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here