वैश्य युवा संघटनेचा पहिला वर्धापनदिन उत्साहात साजरा

0

रत्नागिरी : रत्नागिरीतील वैश्य समाजाच्या युवकांनी स्थापन केलेली वैश्ययुवा ह्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संघटनेचा पहिला वर्धापनदिन दि. 27 डिसेंबर 2020 रोजी संपन्न झाला. त्यानिमित्त वैश्ययुवाचे फेसबुक पेज व लोगो चे अनावरण राधाकृष्ण वैश्य संस्थेचे अध्यक्ष राजन मलूष्टे यांचा हस्ते करण्यात आला. त्यावेळी गेल्या वर्ष भरा मध्ये वैश्ययुवा मार्फत झालेल्या 14 उपक्रमाची माहिती देण्यात आली. त्यात रक्तदान शिबिर, लॉकडॉवन मध्ये प्रशासनाला केलेली मदत असेल, मोफत नेत्र तपासणी शिबीर असेल त्याच सोबत युवकांनी माचाळ ट्रेक, सायकलिंग सारखे उपक्रम ह्याची माहिती देण्यात आली. भविष्यात वैश्य युवा मार्फत असेच सामाजिक उपक्रम करण्याचा निर्धार करण्यात आला. या दिमाखदार कार्यक्रमाला वैश्ययुवाची सर्व टीम उपस्थित होती.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:29 AM 28-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here