‘मुलीवर अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या’

0

रत्नागिरी : पेण येथील अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभागप्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांतिदल यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ‘पेण येथील या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणे गरजेचे असून त्यादृष्टीने हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासंबंधी कार्यवाही करावी. पीडितेच्या कुटुंबीयांना या घटनेतून सावरण्यासाठी समुपदेशन होणे गरजेचे आहे. शासनाच्या मनोधैर्य योजनेतून मदत करण्याची गरज आहे’, असे निवेदनात म्हटले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:01 PM 01-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here