पोफळी येथे झालेल्या शिबिरात 80 कामगारांचे रक्तदान

0

चिपळूण : राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रक्तदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांनी केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून पोफळी येथे महानिर्मिती कंपनीतील विद्युत तांत्रिक कामगार युनियनतर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. शिबिरात ८० कामगारांनी रक्तदान केले. युनियनच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त पोफळी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. जि.प. विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. या वेळी जि.प. सदस्य सुचिता सुवार, सरपंच तेजस्विनी मानकर, महानिर्मितीचे अधीक्षक अभियंता कुंभार, कामगार कल्याण अधिकारी महेश भुरण आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:19 PM 02-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here