आशिष शेलार नवी मुंबई महापालिका निवडणूक प्रभारी

0

मुंबई : भाजपने नुकत्याच झालेल्या संघटनात्मक बैठकांमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या जबाबदारीचे वाटप केले आहे. आशिष शेलार यांना नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नेमले आहे. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या दोघांमध्ये समतोल राखत पालिका निवडणुका जिंकून द्यायचे आव्हान आता आशिष शेलार यांच्यापुढे आहे. तर इतर महापालिका निवडणुकीसाठी मुख्य जबाबदारी आणि प्रभारी यांचे वाटप भाजपने निश्चित करत निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे

भाजपमध्ये जबाबदारीचं वाटप :

  1. नवी मुंबई महापालिका
    निवडणूक प्रमुख -गणेश नाईक
    निवडणूक सहप्रमुख – मंदा म्हात्रे
    निवडणूक संघटनात्मक प्रमुख – संजय उपाध्याय
    निवडणूक प्रभारी – आशिष शेलार
  2. कल्याण डोंबिवली महापालिका
    निवडणूक प्रमुख – रवी चव्हाण
    निवडणूक प्रभारी – संजय केळकर.

3.औरंगाबाद महापालिका निवडणूक
निवडणूक प्रमुख – अतुल सावे
निवडणूक प्रभारी – गिरीश महाजन
निवडणूक संघटनात्मक जबाबदारी – संभाजी पाटील निलंगेकर.

  1. कोल्हापूर महापालिका निवडणूक
    निवडणूक प्रमुख – धनंजय महाडिक आणि महेश जाधव.
    निवडणूक प्रभारी – शेखर इनामदार, रणजित सिंह निंबाळकर
  2. वसई-विरार महापालिका निवडणूक
    निवडणूक प्रभारी – प्रसाद लाड
    निवडणूक सहप्रभारी – जयप्रकाश ठाकूर, भरत राजपूत

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:17 PM 07-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here