भाट्ये येथे बेकायदा दारु बाळगल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : शहरानजीकच्या भाट्ये येथे बेकायदा देशी-विदेशी दारु विक्री करण्यासाठी स्वतःजवळ बाळगल्याप्रकरणी कैलास सुधीर भाटकर (42, रा.महाजनवाडी भाटे, रत्नागिरी) याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार 5 जानेवारी रोजी रात्री 8.15 वा.सुमारास करण्यात आली. यात 1 हजार 248 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याबाबत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक नंदकुमार विष्णू सावंत यांनी तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल झोरे करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:02 PM 07-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here