मराठी पत्रकार परिषदेचे कार्य कौतुकास्पद : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. गर्ग

0

रत्नागिरी : मराठी वृत्तपत्राचे जनक आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी अतिशय कठीण काळामध्ये मराठी वृत्तपत्र चालविले. लोकशाही बळकटीची ती एक नांदी होती. आजही पत्रकारांनी तो दर्जा राखण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. पोलिस, डॉक्टर आणि पत्रकार हे समाजातील महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्यात समन्वय असणे गरज आहे. मराठी पत्रकार परिषदेने सामाजिक बांधिलकीतून केलेले कार्य खरोखर कौतुकास्पद आहे. ही बांधिलकी आणि समाजाला दिशा देण्याचे काम अविरत चालू राहो, अशी सदिच्छा आहे, असे मत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी व्यक्त केले. पत्रकार दिनानिमित्त जिल्हा पोलिस दल आणि मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, वाहतूक पोलिस निरीक्षक शिरीष सासणे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंतकुमार शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:11 PM 07-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here