जिल्हा परिषद आता विजेबाबत लवकरच होणार स्वयंपूर्ण

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद भवनात अपारंपारिक ऊर्जा विकास कार्यकमांतर्गंत सुमारे 62 लाख 64 हजाराच्या निधीतून सौर वीज निर्मीती यंत्रणा उभारण्याच्या कार्यवाही गतीमान झाली आहे. जि.प.सह मंडणगड, गुहागर, चिपळूण व संगमेश्वर या चार पंचायत समिती कार्यालयांच्या इमारतींसाठी देखील ‘रुफ टॉप नेट मिटरिंग’ सौर विद्युत संच बसविण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत उर्जा विकास कार्यकमातून ही वीजनिर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी एकूण 87 लाख 69 हजार 852 रुपयांच्या निधीला मंजूरी मिळालेली आहे. या कार्यालयातील खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हा शासनाने सौर ऊर्जा निर्मितीला प्राधान्य दिले आहे. या सौर वीजनिर्मितीतून जि.प.कार्यालयाला अविरत वीज मिळण्यास मोलाची मदत होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:56 PM 09-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here