महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालावे हीच आमची भूमिका : प्रकाश आंबेडकर

0

अकोला : राज्यातील महाविकास आघाडीतील असलेला वाद यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर त्यांनी औरंगाबाद व संभाजी महाराजांचा संबंध नाही. कॉन्ग्रेस व शिवसेना यांच्यात भांडण होऊ नये. ही आमची भूमिका आहे, असे ते म्हणाले. महाआघाडीचे सरकार पाच वर्ष चालावे, त्यांच्यात टोकाची भांडणे होवू नये, म्हणून वंचितने हा तोडगा मांडला होता. सेनेने हा तोडगा मान्य करावा, प्रेसटीज इश्यू करू नये, असा सल्ला त्यांनी शिवसेनेला दिला. भाजप याअगोदर सरकार मध्ये होती. त्यांनी औरंगाबाद चे नामांतर का केले नाही, याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे, अशी विचारणा त्यांनी केली. स्टेटमेंट वरती स्टेटमेंट भाजप करीत राहील. शिवसेनेने आरएसएस सारखी भूमिका ‘इंगोरन्सी’ घेतली पाहिजे. तर यांचे सरकार पाच वर्षे चालेल, असे ते स्पष्ट म्हणाले. नाही तर अशीच धुसफूस राहिली तर कॉन्ग्रेसला मुस्लिम व्होन्ट बँक आहे, शिवसेनेला हिंदु व्होन्ट बँक आहे. आपल्या व्होन्ट बँक सांभाळण्याच्या नादात सरकार जाऊ नये, असा इशारा त्यांनी दिला आहे. नाही तर सकाळी चार वाजता, पाच वाजता महाराष्ट्राने नवा शपथविधी पाहिलेला आहे. तसं काही होवू नये याची दक्षता घ्यावी, इंडिकेशन तसे यायला सुरुवात झाली आहे. हा शेवटी बॉल जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात आहे. त्यांना हा कॉल घ्यावा लागेल की हा प्रश्न भिजत ठेवायचा की संपवायचा आहे, असेही वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर राष्ट्रवादी बाबत ते म्हणाले, राष्ट्रवादी ने गेल्या पाच वर्षात कोणत्या प्रश्नावर कुठली भूमिका घेतली आहे का हे आधी सांगावे. जातीचा पक्ष आहे. जातीची संख्या जास्त आहे म्हणून राज्य आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:09 PM 09-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here