हातखंबा येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

हातखंबा : हातखंबा येथे रक्तदान शिबिर पार पडले. हातखंबा, पाली, झरेवाडी, निवळी, भोके, वेळवंड, कापडगाव, चरवेली, नाणीज आदी परिसरातील ७५ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात, येथील पथकाने व मुन्ना देसाई मित्रमंडळाने रक्तदान शिबिरप्रसंगी मेहनत घेतली. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना जि. प. सदस्य परशुराम कदम यांनी विशेष धन्यवाद दिले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:05 PM 11-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here