‘मी पुन्हा येणार’; फडणवीसांना अजूनही आशावाद

0

नाशिक : पत्रकारांच्या समस्या सोडविण्याचा अधिकार आपल्याला आज नाही; मात्र उद्या, परवा तो मिळेलच असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये ‘मी पुन्हा येणार’ असं म्हणत पुन्हा मुख्यमंत्री होणार असा आशावाद व्यक्त केला. अखिल भारतीय पुरोगामी प्रसार माध्यम पत्रकार संघाने बुधवारी परशुराम सायखेडकर नाटय़गृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री असताना आपण पत्रकारांच्या अनेक समस्या सोडविल्या, योजना अंमलात आणल्या. आजही पत्रकार संघाच्या पदाधिकाऱयांनी आपल्या अनेक समस्या मांडल्या. मात्र त्या सोडविण्याचा अधिकार आज मला नाही. उद्या, परवा तो अधिकार प्राप्त होईलच असे सांगत त्यांनी, पुन्हा मुख्यमंत्री होणार असा आशावाद व्यक्त केला. याप्रसंगी या पत्रकार संघाचे अध्यक्ष शशिकांत पगारे, प्रियदर्शन टांकसाळे, विलास पाटील आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:41 AM 14-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here