भूपिंदर सिंह मान यांची सर्वोच्च न्यायालयाच्या समितीतून माघार

0

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाचा आज ५० दिवस पूर्ण होत आहेत. दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी एका चार सदस्यीय समितीचं गठन केलं होतं. याच समितीत भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष भूपिंदर सिंह मान यांचाही एक सदस्य म्हणून समावेश करण्यात आला होता. मात्र, आज भूपिंदर सिंह मान यांनी या समितीतून काढता पाय घेतलाय. भूपिंदर सिंह मान यांनी एक पत्र लिहून समितीतून बाहेर पडत असल्याची माहिती दिलीय. समितीत आपल्याला सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. तसंच आपण नेहमीच पंजाब आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी उभं असल्याचंही त्यांनी म्हटलंय. एक शेतकरी आणि शेतकरी संघटनेचा नेता असल्यामुळे आपण शेतकऱ्यांच्या भावना समजू शकतो. आपण शेतकऱ्यांप्रती आणि पंजाबप्रती नेहमीच निष्ठावंत आहोत. शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही. यासाठी आपण कोणत्याही मोठ्या पदावर पाणी सोडायला तयार आहोत, असंही या पत्रात मान यांनी म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेली जबाबदारी आपण निभावू शकणार नाही. त्यामुळे या समितीतून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं मान यांनी स्पष्ट केलंय.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:23 PM 14-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here