पुणे : राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप आणि राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक यांच्या जावयाला ड्रग्जच्या प्रकरणात अटक झाली. या मुद्यावरून भाजप नेते निलेश राणेंनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली होती. राणेंच्या या टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मोदी साहेबांमुळे डिजिटल पेमेंट करायची लोकांना सवय झाली आणि डिजिटल पेमेंट मुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जच्या लफड्यात पकडला गेला. राष्ट्रवादीत चाललंय काय?? इतके गुन्हेगार मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. यावर ”ते काही बोलतात आणि त्यावर मी बोलायाचे का? पण एक सांगतो त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, अशा शब्दात अजित पवारांनी राणेंना प्रत्युत्तर दिलं आहे. पुण्यात सर्किट हाऊस येथे पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:38 PM 15-Jan-21