शिरशिंगे येथे कामगाराचा खून

0

दापोली : तालुक्यातील शिरशिंगे येथे बुधवारी पहाटे ६.३० वा. च्या सुमारास रोहा (जि. रायगड) येथील एका कामगाराची हत्या करण्यात आली. त्याच्याच सहकाऱ्याने त्याचा खून केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. मृत व्यक्तीचे नाव लुईस असे आहे. याबाबत दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दापोली शहरापासून ८ कि. मी. अंतरावर असणाऱ्या शिरशिंगे गावामध्ये पिंपळाचा माळ येथे रोशन मोरे यांनी घेतलेल्या जागेत बंगले बांधण्याचे काम सुरू आहे. येथे परशुराम कांबळे या ठेकेदाराने रोहा (जि. रायगड) येथून भगवान मोरे, अशोक जंगम राजेश गोडरे व मयत लुईस यांना बांधकामासाठी कामगार म्हणून आणले होते. ग्रामपंचायत निवडणूक असल्याने काही दिवसांपूर्वी ठेकेदार कांबळेसह भगवान मोरे व अशोक जंगम हे रोहा येथे गेले होते. मृत लुईस (पूर्ण नाव, पत्ता अद्याप पोलिसांकडे उपलब्ध झालेला नाही) व संशयित राजेश नारायण गोडरे (रा, महादेव नगर, रोहा, जि. रायगड) हे दोघेच शिरशिंगे येथे राहत होते. पोलिसांच्या अंदाजानुसार, दोघांमध्ये अज्ञात कारणातून वाद होऊन कोणत्यातरी हत्याराने लुईस याच्या डोक्याच्या डाव्या बाजूस व डाव्या कानावर घाव घातले व त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा. दरम्यान दापोली पोलिस ठाण्यात याबाबत नितीन सीताराम जाधव (रा. शिरशिंगे) यांनी फिर्याद दाखल केली असून या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील हे करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:09 PM 21-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here