काँग्रेस अध्यक्षपदासाठी ‘या’ ३ दावेदारांमध्ये चुरस

0

नवी दिल्ली : काँग्रेस अंतर्गत वाद आणि रखडलेली पक्षाध्यक्षाची निवड या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस कार्य समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची धुरा दिली जाण्याची शक्यता आहे. पण राहुल गांधी नेतृत्व स्वीकारण्यास तयार नसल्यामुळे गांधी कुटुंबाच्या विश्वासू व्यक्तीकडे नेतृत्व देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. यात सुशील कुमार शिंदे, मीरा कुमार आणि अशोक गेहलोत यांची नावं शर्यतीत असल्याचं समजतं. अशोक गेहलोत राज्य सोडण्यास अनुत्सुक असल्याने काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुशील कुमार शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याचं म्हटलं जात आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:04 PM 22-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here