रत्नागिरी जिल्ह्यातील सात किल्ले राज्य संरक्षित

0

रत्नागिरी : जिल्ह्यातील 27 किल्ल्यांपैकी पुरातत्त्व विभागामार्फत सात किल्ले संरक्षित करण्यात आले असून, दोन किल्ल्यांचे संवर्धन काम हाती घेण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 27 किल्ले आहेत यातील खेड तालुक्यातील रसाळगड, मंडणगड तालुक्यातील बाणकोट, रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड, राजापूर तालुक्यातील यशवंतगड, गुहागर तालुक्यातील गोपाळगड, दापोली तालुक्यातील गोवा किल्ला, संगमेश्वर तालुक्यातील महितपगड हे किल्ले पुरातत्व विभागाकडून संरक्षित करण्यात आले आहेत. रत्नागिरीतील पूर्णगड आणि बाणकोट तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यशवंतगड आणि भरतगड या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासनाकडून 17 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यातील पूर्णगड किल्ल्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून, आता हा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. पुरातत्व विभागाकडून अन्य किल्ल्यांचीही पाहणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील महिपतगड आणि दापोली गोवा किल्लाच्या संवर्धनासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.
सामाजिक दायित्व अंतर्गत लोकसहभागातुन गडकिल्यांची देखभाल करण्यासाठी पुरातत्व विभागाने पाऊले उचलली आहेत. यातून गडकिल्यांचे पावित्र्य जपण्याबरोबरच जतन, संवर्धन व संरक्षण करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत दापोलीतील गोवा आणि रत्नागिरीतील पूर्णगड किल्ल्यांची देखभाल केली जाणार आहे. पुण्यातील दोन उद्योजकांना याची जबाबदारी स्वीकारली असून, किल्याच्या दररोजच्या देखभार दुरुस्तीसाठी प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:19 PM 25-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here