एक उनाड दिवस निसर्गाच्या सानिध्यात

0

◼️ ऊर्मी ग्रुपचा उपक्रम; सप्तेश्‍वरला व्हॅली क्रॉसिंग

रत्नागिरी : मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुष्टचक्राने वैतागलेल्या महिलांना रिफ्रेश होण्यासाठी येथील उर्मी ग्रुपतर्फे ‘एक उनाड दिवस निसर्गाच्या सानिध्यात’ हा उपक्रम येत्या रविवारी (ता. 31) राबवण्यात येणार आहे. रत्नदुर्ग माउंटेनिअर्सच्या साह्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उर्मी ग्रुपतर्फे संगमेश्‍वर तालुक्यातील सप्तेश्‍वर येथे व्हॅली क्रॉसिंग व तत्सम उपक्रम घेतले जाणार आहेत. यामध्ये महिला आपल्यासोबत 12 वर्षावरील पाल्यालाही सहभागी करून घेऊ शकणार आहेत. यावेळी गिर्यारोहणाची शास्त्रशुद्ध माहिती ‘रत्नदुर्ग’तर्फे दिली जाणार आहे. ‘उर्मी’तर्फे याआधीही महिलांकरिता विविध कार्यक्रम राबवले आहे. जागतिक महिलाच्या निमित्ताने लांजा तालुक्यातील दुर्गम अशा माचाळ येथे ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कॉलेज युवतींपासून 60 वर्षीय ज्येष्ठ मैत्रिणींनी सहभाग नोंदवला होता. उर्मीतर्फे महिलांकरिता हा पहिला ट्रेक होता. यावेळी मुचकुंद ऋषींची गुहा पाहण्याची संधी महिलांना मिळाली होती. सप्तेश्‍वर व्हॅली क्रॉसिंग उपक्रमात सहभाग नोंदविण्याकरिता आदिती पटवर्धन (9403508088), कल्याणी पटवर्धन (7720800032) किंवा कीर्ती पटवर्धन (9881236600) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘ऊर्मी’ ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:28 PM 28-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here