रत्नागिरी : येथील छावा प्रतिष्ठानतर्फे गुहागर एसटी आगारातील कर्मचाऱ्यांसाठी उद्या शनिवारी (दि. ३० जानेवारी) मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. छावा प्रतिष्ठान ही संस्था गेली ६ वर्षे रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक शिबिरे अशा क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेने इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित केले आहे. कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधाचे पालन करून गुहागर एसटी आगारातील कर्मचाऱ्यांची मोफत नेत्र तपासणी केली जाईल. गुहागर एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन छावा प्रतिष्ठानचे संस्थापक तथा अध्यक्ष सुनील धावडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी समीर अनंत धावडे (संघटक रत्नागिरी जिल्हा, ९१३००८५४४१) किंवा समीर श्रीपत गोताड (सचिव रत्नागिरी जिल्हा, ९२८४१६७९३०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:42 PM 29-Jan-21