ज्येष्ठ सी. ए. निळकंठ पटवर्धन यांचा सत्कार

0

रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या वतीने रत्नागिरीतील ७९ वर्षांचे सी. ए. निळकंठ पटवर्धन यांना ‘वुई केअर’ अंतर्गत सीए इन्स्टिट्यूटच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष सीए ललित बजाज यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित केले. मथुरा हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात हा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सीए इन्स्टिट्यूट पश्चिम विभागाचे सेक्रेटरी मुर्तुझा काचवाला, कौन्सिल मेंबर यशवंत कासार, रत्नागिरी शाखाध्यक्ष बिपिन शहा, उपाध्यक्ष आनंद पंडित उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना श्री. पटवर्धन म्हणाले की, रत्नागिरीत शिक्षण घेतल्यावर १९६४ साली पुण्याच्या बीएमसीसी कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. नंतर मुंबईत येऊन (कै.) गंगाधरभाऊ पटवर्धन यांच्या श्रीकृष्ण बोर्डिंगमध्ये राहून १९७२ मध्ये सी. ए. झालो. त्यावेळी माझ्यासोबत राहून जयंत पटवर्धन विधीचे शिक्षण घेत होते. सुरवातीला मुंबईत एस. जी. अरगडे यांच्याकडे दीड वर्ष ऑडिट क्लार्क म्हणून काम केले. आर्टिकलशिप केली. ई. एल. कोळवणकर सर यांचेही मार्गदर्शन मिळत गेले. नंतर हळूहळू सी. ए. फर्म सुरू केली. कामे वाढत गेली, आजही कामे करतो. आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. या सर्व प्रवासात पत्नी सौ. उज्ज्वलाची मोलाची साथ लाभल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. दर आठवड्याला प्रश्नरपत्रिका सोडवून (पोस्टल कोर्स) करावा लागे. स्टुडंट्स असोसिएशनच्या माध्यमातून त्याचे प्रमाणपत्र जोडावे लागे. त्यानंतरच सी. ए. इंटर परीक्षेला बसता येई. नंतर फायनल परीक्षा व्हायची. चार वर्षांनंतर सी. ए. झालो. त्या वेळचे इन्स्टिट्यूटचे नियम वेगवेगळे होते, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

त्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:51 PM 03-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here