संगमेश्वरात कार-दुचाकी अपघात, दोघेजण जखमी

0

देवरुख : मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयासमोर इनोवा-मोटरसायकल अपघात होऊन दुचाकीवरील दोघे किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. कणकवली येथून मुंबईकडे जाणारी ईनोवा गाडी क्रमांक एमएच ०७ क्यू ३५३२ ही संगमेश्वर पासून जवळ असलेल्या संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयासमोर आली. याचवेळी कसबा येथील संगमेश्वरकडे जात असताना दुचाकीच्या चालकाने आपली मोटारसायकल विरुद्ध बाजूला घेतल्याने इनोवा व मोटारसायकल मध्ये समोर-समोर अपघात झाला. यात मोटारसायकलवरील दाजी झोंडू मालप वय (वर्षे ६५), शालींदर सखाराम पवार (वय वर्षे ४५) हे दोघे जखमी झाले. जखमींवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात अधिक औषध उपचारासाठी हलविण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:02 PM 03-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here