पंतप्रधान मुद्रा योजनेतून कर्ज मिळवून देतो सांगत ७३ हजारांची फसवणूक

0

खेड : तुम्हाला पंतप्रधान मुद्रा योजनेतून कर्ज मिळवून देतो, असे सांगून वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी सीताराम जाधव (रा. चिंचघर, प्रभूवाडी खेड) यांची ऑनलाईन ७३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. खेड तालुक्यातील चिंचघर प्रभुवाडी येथील सीताराम हे खेड येथील एका किरणामालाच्या दुकानात काम करीत आहेत. त्यावेळी संशयित आरोपी विजय पवार याने त्यांच्या मोबाईलवर फोन करून तुम्हाला पंतप्रधान मुद्रा योजनेतून ५ लाख कर्ज मिळवून देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. कर्जाची प्रक्रिया फी व इतर कारणे सांगून सीताराम यांच्याकडून गुगल पेद्वारे ७३ हजार रुपये एवढी रक्कम ऑनलाईन भरून घेतली. मात्र, त्यानंतर कोणतेही पाच लाखांचे कर्ज मंजूर न करता त्यांची फसवणूक केली. त्यामुळे खेड पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार करण्यात आली आहे. याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:33 PM 05-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here