कोकणात अवकाळीची शक्यता

0

रत्नागिरी : कोकणातील जिल्ह्यात सध्या गेल्या काही दिवसांत गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. त्यामुळे आंबा हंगामातील बागायतदरांची चिंता काहीशी मिटली होती. मात्र, आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे बागायतदरांमध्ये चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. या वातावरणात बदल होण्याची शक्यता असून, पुढच्या काही दिवसांमध्येकोकणातील काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारीच्या उत्तरार्धात सुरुवातीच्या दिवसांमध्ये हवामान बदलणार असून, काही भागात विशेषतः कोकण किनारपट्टी भागात पाऊस पडणार आहे.१६ ते २० फेब्रुवारी दरम्यान या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामधून बाष्प देशातील भू-भागावर येईल. त्यामुळे हवामानात बद होऊन पावसाची शक्यता आहे. मात्र, त्याचे प्रमाण तुरळक असल्याचा अंदाज ‘स्कायमेट ने बांधला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:49 AM 15-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here