माघी गणेशोत्सव यात्रा रद्द, तरीदेखील गणपतीपुळेत भाविकांची गर्दी

0

रत्नागिरी : कोरोनामुळे गणपतीपुळेत माघी गणेशोत्सव यात्रा रद्द केली असली तरीही शनिवार, रविवार जोडून सुट्ट्या आल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील भक्तांची श्रींच्या दर्शनाला प्रचंड गर्दी झाली. रविवारी (दि. 14) पाच ते सहा हजार लोकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यात्रा रद्द असली तरीही प्रथेप्रमाणे मंदिरात श्री गणेश मुर्तीची पुजा-अर्चा सुरु आहेत. रविवारी सकाळी पारंपरिक पद्धतीने श्रींच्या कलशारोहण विशेष दिनाचे औचित्य साधून देवस्थानचे पंच अमित मेहेंदळे यांच्या हस्त गणेश याग करण्यात आला. संस्थानचे खजिनदार नीलेश कोल्हटकर यांच्या हस्ते गणपतीची पूजा करण्यात आली. उदय शेंडे यांनी देवस्थानतर्फे श्रींना सहस्त्रमोदक अर्पण केले. हा सोहळा नियमित गुरुजींच्या उपस्थितीत झाला. यंदा कोरोनाच्या सावटामुळे माघी गणेशोत्सवाची यात्रा रद्द करण्यात आल्याचे देवस्थानतर्फे जाहीर केले होते. तरीही अनेक भाविकांनी माघी उत्सावाला आरंभ होण्यापूर्वी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. कोल्हापूर, सातारा, सांगलीसह आजूबाजूच्या परिसरातील आणि स्थानिकांनी दर्शनासाठी सकाळपासून मंदिरात हजेरी लावली होती.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:44 AM 15-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here