‘आमच्या नेत्याचं शिक्षण काढू नका, वाटेला जाल तर याद राखा’; राणे समर्थकांचा खा. विनायक राऊतांना इशारा

0

रत्नागिरी : भाजप खासदार नारायण राणे यांना टोला लगावलेल्या शिवसेना खासदार विनायक राऊत यांना राणे समर्थकांनी इशारा दिलाय. आमच्या नेत्याचं शिक्षण काढू नका, आमच्या वाटेला जाल तर याद राखा, अशा शब्दात राणे समर्थकांना विनायक राऊतांना इशारा दिला आहे. ‘मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या एका नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल, अशी बोचरी टीका विनायक राऊतांनी केली होती. यावरुन राणे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी विनायक राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. इतकच नाही तर आमच्या वाटेला जाल तर याद राखा, असा इशाराही भाजप कार्यकर्त्यांनी विनायक राऊत यांना दिला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:32 PM 16-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here