आजपासून राजकीय, सामाजिक, धार्मिक मिरवणुका, मोर्चे, यात्रांवर बंदी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

0

मुंबई : मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का, अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधला. ‘कारण नसताना उगाच कुणी आपल्याला घरात बंद करून ठेवणे हे कुणालाच आवडणार नाही. मात्र लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा. मास्क घाला, हात धुवा, शारीरिक अंतर राखा आणि लॉकडाऊन टाळा’, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या आठ दिवसांत परिस्थिती पाहून लॉकडाऊनचा निर्णय घेऊ असेही बजावले. आज सोमवारपासून सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक मिरवणुकीवर तसेच मोर्चे यात्रांवर काही दिवसांसाठी बंदी घालण्यात आली असून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेनंतर आता ‘मी जबाबदार’ ही मोहीम राबवली जाईल आणि मंगळवारपासून सर्व शासकीय कार्यक्रम ऑनलाइन होतील असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:23 AM 22-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here