कृपा करा, कठोर निर्णय घेण्याची वेळ राज्य सरकारवर येऊ देऊ नका : उपमुख्यमंत्री अजित पवार

0

रायगड : राज्यात कोरोनासंदर्भात कठोर निर्णय घेण्याची वेळ शासनावर आणू नका, याकरिता नियमांचे पालन करा, असे अवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला केले आहे. पनवेल येथील न्हावा शेवा टप्पा 3 पाणी पुरवठा योजनेच्या उद्धाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते. लॉकडाऊनमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईला जाते. रोजंदारीवरील कामगारांना चूल पेटवता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे अजित पवार म्हणाले. याचबरोबर, भविष्यात पाण्यासाठी युद्ध होणार आहेत. अनेक राज्यात पाण्याचे वाद झाले आहेत. हे वाद जिल्हा, तालुका, गावात पोहोचले आहे. पाण्याचा थेंब साठविणे गरजेचे आहे. पाणी जीवन आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकांना पाण्याचे महत्व पटवून दिले पाहिजे. लोकांना जल साक्षर करण्याची आता वेळ आली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करा, लॉकडाऊनची वेळ येणार नाही, याची खबरदारी घ्या, असेही अजित पवार म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:43 PM 22-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here