कोरोना प्रतिबंधासाठी आदेश जारी

0

रत्नागिरी : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची दुसरी लाट येत असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे व दिवसेंदिवस कोरोना विषाणूने बाधीत व्यक्तींच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याने लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी आदेश निर्गमित केले आहेत. यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे

◼️ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होत असणाऱ्या विविध क्रिडा स्पर्धा उदा. कबड्डी, क्रिकेट, खो-खो, इ. यांना उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या पुर्वपरवानगी शिवाय भरविण्यास मनाई करण्यात येत आहे.

◼️ स्थानिक प्राधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय आठवडे बाजार, जनावरांचे बाजार, भरवता येणार नाहीत.

◼️ कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक, धार्मिक समारंभ साखरपुडा, मुंज, पुजा, आरती, नमाज इत्यादी ज्यामध्ये 50 च्या मर्यादेपर्यंत लोक एकत्रित येण्याची शक्यता आहे अशा कार्यक्रमांना उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.

◼️ उदयाने, मोकळया जागा, मनोरंजन पार्क, क्रिडांगणे, समुद्र किनारे अशा ठिकाणी एकाच वेळी 50 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास या आदेशाव्दारे मज्जाव करण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
6:42 PM 23-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here