‘जीएसटी’ जाचक आंदोलनाला सिंधुदुर्गातील व्यापाऱ्यांचा पाठिंबा

0

◼️ बंद न पाळता काळे झेंडे फडकवणार

सिंधुदुर्ग : जीएसटी कायद्यातील जाचक तरतूदी व अधिकाऱ्यांच्या मनमानीला पोषक ठरणाऱ्या नव्या तरतुदींच्या विरोधात व्यापाऱ्यांच्या ‘कॅट’ या देशपातळीवरील तसेच महाराष्ट्र चेंबरसह अन्य संघटनांनी शुक्रवार 26 फेब्रुवारी रोजी भारत बंद आंदोलन पुकारले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने कॅटच्या या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेट्ये यांनी दिली. दरम्यान, सिंधुदुर्ग व्यापारी संघाने नुकतेच 31 जानेवारीला एकता मेळाव्याच्या निमित्ताने बंद पाळून आपल्या एकजुटीचे प्रदर्शन केलेले असल्याने पुन्हा बंद न पाळता 26 फेब्रुवारीला सर्व व्यापाऱ्यांनी काळ्याफिती लावून आणि आपल्या दुकानांबाहेर काळे झेंडे लावून जीएसटी कायद्यातील जाचक तरतूदींविरोधी आंदोलनात सहभागी व्हावे, असा निर्णय महासंघाने घेतला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:55 PM 25-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here