देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा

0

मुंबई : देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले असून निवडणूक आयोगाकडून होणाऱ्या तारखांच्या घोषणेची वाट पहात आहेत. आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी पहायला मिळणार आहे. त्यासाठी, भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत.

कोरोना कालावधीत राज्यसभेच्या 18 जागांसाठी निवडणूक घेणं आव्हान होतं. त्यानंतर, बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतदानाची मोठी प्रक्रिया आपण पार पाडली. त्यामुळे, आताही त्याच पद्धतीने 5 राज्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेऊ. कोरोनामुळे नवी आव्हानं आहेत, नियम पाळून प्रक्रिया पूर्ण करू, असे निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी म्हटलं. तसेच, आसाममधील १२६, तामिळनाडू २३४, पश्चिम बंगालमध्ये २९४, केरळ १४० आणि पद्दुचेरीत ३० जागांसाठी विधानसभा निवडणूक होणार आहे. तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ २४ मे २०२१ रोजी, पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ ३० मे २०२१ रोजी, केरळ विधानसभेचा कार्यकाळ १ जून रोजी तर आसाम विधानसभेचा कार्यकाळ ३१ मे रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे, विधानसभेचा कार्यकाळ समाप्त होण्यापूर्वी निवडणुकांसाठी मतदानप्रकिया पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच, आदर्श आचारसंहिता लागू होणार असल्याचेही अरोरा यांनी सांगितलं. पाच राज्यातील निवडणुकांसाठी एकूण 824 मतदारसंघात मतदान प्रकिया पार पडत असून 18.68 कोटी नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी, 2.7 लाख मतदान बुथ केंद्र उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, पाच राज्यातील होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक कार्यक्रमासाठी मतदानाची एका तासाची वेळ वाढविली जाणार आहे, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय.

आसाममध्ये २७ मार्च, १ एप्रिल आणि ६ एप्रिल अशा तीन टप्प्यात विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार, २ मे रोजी निकाल जाहीर होणार

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:23 PM 26-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here