लांजात व्यापाऱ्यांचा काळ्या फिती लावून ‘भारत बंद’ मध्ये सहभाग

0

लांजा : जीएसटी करप्रणालीतील जाचक अटीं विरोधात आज छेडण्यात आलेल्या ‘भारत बंद’ मध्ये लांजा तालुका व्यापारी संघटनेने दुकाने बंद न ठेवता दुकानात काळया फिती लावून व तहसीलदार लांजा यांना निवेदन सादर करून बंदला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. तहसीलदार समाधान गायकवाड यांना निवेदन देताना संघटनेचे उपाध्यक्ष राहूल शिंदे, सेक्रेटरी प्रभाकर शेट्ये, सल्लागार महंमद रखांगी, कुमार बे़डखले, प्रविण शेट्ये, किशोर पटेल, मिलींद उपशेट्ये, मंदार भिंगार्ङे उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:45 PM 26-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here