कोकण रेल्वे दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचाही वापर करणार

0

रत्नागिरी : कोकण रेल्वे अधिकारी, कर्मचारी यांनी दैनंदिन व्यवहारात इतर भाषांच्या बरोबरीने मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्याचा निश्चिय मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात साजरा केला. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून कोकण रेल्वेच्या विभागीय कार्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राजभाषा दिनानिमित्त फलकाचे अनावरण विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपेंद्र शेंडये यांच्या हस्ते झाले. यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी विविध कार्यक्रम सादर केले. याप्रसंगी उपेंद्र शेडये यांनी मराठी भाषेच्या इतिहासाबद्दल माहिती देताना गेल्या शेकडो वर्षात ती कशी विकसित होत गेली हे सांगितले. आपले कर्मचारी अधिकारी दैनंदिन व्यवहारात मराठीचा कसा प्रभावीपणे वापर करू शकतात याची माहिती दिली. या कार्यक्रमानिमित्ताने कोकण रेल्वेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर अधिक आणि प्रभावीपणे करण्याचा निश्चय केला. यावेळी वरिष्ठ विभागीय अभियंता श्री. नाडगे यांनी मराठी भाषेतील बोलीभाषा आणि त्यांचा प्रांतवार होणार वापर आणि भाषेतील वेगळेपण यावर विचार मांडले. यावेळी जी. राजकुमार, श्रीकांत सिद्धलिंग, गिरीश रहाळकर, शैलेश आंबर्डेकर, सुधा पंडित, सायली शिंदे, सचिन देसाई उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:32 PM 03-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here