बचतगटांना कोरोनाचा फटका; ‘सरस प्रदर्शन’ रद्द

0

रत्नागिरी : महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना, पदार्थांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी गेली चार वर्षे रत्नागिरीतील प्रसिध्द गणपतीपुळे पर्यटनस्थळी दरवर्षी सरस प्रदर्शन आयोजित केले जाते. यामध्ये सहभागी झालेल्या शंभरहून अधिक बचत गटांना आर्थिक फायदा होतो. यंदा कोरोनामुळे उमेद अभियानांतर्ग जिल्ह्याला निधीच न आल्यामुळे बचत गटांचे नुकसान झाले आहे. ऐन कोरोना काळात आर्थिक हातभराची गरज असताना आला प्रदर्शन रद्दने मोठे नुकसान झाले आहे.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात पंधरा हजाराहून अधिक बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. त्या गटांमधील अनेक महिला विविध व्यावसाय करत आहेत. महिला गटांनी बनवलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत मुंबई, ठाण्यासह प्रसिध्द पर्यटन स्थळांच्या ठिकाणी महिला बचत गटांचे सरस प्रदर्शन भरविण्याचा निर्णय घेतल. या प्रदर्शनात स्थानिक बचत गटांना सहभागी करुन घेतले जाते. रत्नागिरीतील सरस प्रदर्शन गणपतीपुळे येथे भरविले जाते. तेही खिसमसच्या सुट्टीत म्हणजे 25 ते 31 डिसेंबर या कालावधीत होते. या काळात गणपतीपुळे परिसरात लाखो पर्यटक येतात. त्यामुळे महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची या प्रदर्शनाच्या माध्यमातूम मोठ्या प्रमाणावर विक्री होते. यामधून दरवर्षी चाळीस ते पन्नास लाखांची उलाढाल होते. प्रत्येक बचत गटाला 60 ते 70 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. सरससाठी शासनाकडून सुमारे दहा लाखांचा निधी दिला जातो. यावर्षी कोरोनामुळे शासनाकडून निधीच प्राप्त झालेला नाही. त्यामुळे प्रदर्शन आयोजित करता आलेले नाही. याचा परिणाम महिला बचत गटांच्या व्यवसायावर झाला असून दरवर्षी मिळणाऱ्या उत्पन्नावर पाणी फेरावे लागले आहे. कोरोनातील टाळेबंदीमुळे अनेक महिला बचत गटांना तयार केलेली उत्पादने स्थानिक बाजारातच विक्री करावी लागत होती. सरस सारखी प्रदर्शने त्यांच्यासाठी अधिकचे उत्पन्न मिळवण्याचे साधन आहे. त्यामुळे अशी प्रदर्शने भरवून बचत गटांना दिलासा देण्याची खऱ्या अर्थाने गरज होती.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:29 PM 03-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here