स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या शिबिराला प्रतिसाद

0

रत्नागिरी : बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेत १० दिवसांत पापड, लोणचे आणि मसाले बनविण्याचे मोफत प्रशिक्षण झाले. या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील २६ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. प्रशिक्षणात स्वच्छता, साहित्य आणि उपकरणांची हाताळणी व निगा, मिरची पावडर, मालवणी, गोडा, संडे, भाजका मिक्स, बिर्याणी, कांदा लसूण, सांबार आदी मसाले, कोळंबी, कैरी, मिरची, आवळा, लिंबू, मिक्स भाज्यांचे, चिंच आदी लोणची बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तांदूळ, टॉमेटो, बटाटा, साबुदाणा, कोथिंबीर आदींसह अनेक प्रकारचे पापड बनवायला शिकवले. उद्योजकीय सक्षमता, प्रेरणा, व्यक्तिमत्त्व विकास, बँकेच्या विविध योजनांविषयी संस्थेचे संचालक दर्शन कानसे यांनी मार्गदर्शन केले. समारोपाच्या वेळी प्रशिक्षणार्थींनी आपले अनुभव सांगितले. प्रशिक्षणाचा उपयोग भविष्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी होईल, असे मत व्यक्त केले. प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. पापड लोणचे आणि मसाले बनविण्याचे प्रशिक्षण एम. एम. जोशी यांनी दिले. प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी संस्थेचे प्रशिक्षक देवेंद्र सांबरे, प्रसाद कांबळे, सौ. विदिशा गावखडकर, प्रसाद शिंदे यांनी मेहनत घेतली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:32 PM 06-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here