शिवसेना आमदार भास्कर जाधव संतापले; विरोधकांवर केले गंभीर आरोप

0

मुंबई : मुकेश अंबानी प्रकरणातील स्कोर्पिओ गाडी मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवरून विधानसभेत आज सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. मनसुख हिरेन प्रकरणावरून विरोधकांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर थेट खूनाचे आरोप केले. यावरून सभागृहात गोंधळ माजला, सत्ताधारी आणि विरोधक यांच्या गोंधळामध्ये विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं.

याबाबत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विरोधकांवर आक्रमक निशाणा साधला, जाधव म्हणाले की, २०१८ मध्ये अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबून टाकले, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सासू आणि नवऱ्याच्या मृत्यूची चौकशी करावी असं पत्र दिलं, देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण दाबलं असंही म्हटलं, या प्रकरणाची चौकशी सचिन वाझे करत आहेत, म्हणून त्यांच्यावर आरोप करून त्यांना काढून टाकण्याची मागणी केली जातेय, पण सरकार सचिन वाझेंना काढणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. इतकचं नाही तर आमचं केंद्रात सरकार आहे, त्यामुळे विरोधकांना असं वाटतंय आमचं कोणी काही करू शकत नाही. राज्यानं ज्यांचे संरक्षण काढलं अशा गुंडांना केंद्राने संरक्षण दिलं. जस्टिस लोया यांची नागपूरात हत्या कशी झाली? हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावे. सचिन वाझे तपास अधिकारी राहिला तर विरोधकांचे बिंग फुटेल याची भीती देवेंद्र फडणवीसांना आहे असा आरोपही भास्कर जाधव यांनी केला यावर देवेंद्र फडणवीसांनीही चोख उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सभागृहात इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावर गदारोळ होत असताना मुख्यमंत्री कुठे आहेत…? पोलीस लोकांची हत्या करतायेत. सचिन वाझे यांना कोणाच्या दबावाखाली वाचवण्याचं काम सुरू आहे. अन्वय नाईक प्रकरणात हायकोर्टाने काय म्हटलंय हे भास्कर जाधव यांना माहिती नाही. गृहमंत्र्यांना खुलं आव्हान आहे, कर नाही त्याला डर कशाला….माझी चौकशी करावी….धमक्या देऊन सचिन वाझेंना वाचवण्याचा प्रयत्न करतायेत का? असा सवाल त्यांनी ठाकरे सरकारला विचारला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:32 PM 09-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here