‘मराठा आरक्षण द्या, नाहीतर विष घ्यायची परवानगी द्या’ म्हणणाऱ्या उदयनराजेंना अजित पवारांचा सल्ला

0

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला होता. मराठा समाजाला आरक्षण तरी द्या, अन्यथा आम्हाला विष पिऊन मरु द्या अशा मथळ्याखाली त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उदयनराजे भोसले यांना एक सल्ला दिला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं बुधवारी सूप वाजलं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. दरम्यान, ५ जुलैपासून आता विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
“अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा व्यवस्थित मांडला आहे. कोणी काय धमकी द्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता सर्वोच्च न्यायालयानं जे काही सांगितलं आहे त्यात कोणाला काय म्हणायचं आहे याचा अधिकार सर्वांनाच दिला आहे. यात काही संघटना, राज्यांचा, केंद्राचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. असं काही करण्यापेक्षा ते राज्यसभेचे सदस्य आहेत. तिकडचं अधिवेशन सुरू आहेत. त्यामुळे तिथे गेले तर बरं होईल,” असं अजित पवार यावेळी म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:19 PM 11-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here