जांभारी गावचा प्रसिद्ध भैरीदेवाचा शिमगोत्सव यावर्षी साधेपणाने साजरा होणार

0

रत्नागिरी : खंडाळा परिसरातील सर्वात मोठा शिमगोत्सव हा जांभारी गावचा शिमगोत्सव म्हणून प्रसिद्ध आहे. या शिमगोत्सवासाठी जांभारी गावात अनेक भाविक शिमगोत्सवाचा आनंद लूटण्यासाठी वर्षानुवर्षे येत आहेत. संपूर्ण गावात पालखीच्या आगमनाच्या वेळी मुख्य रस्त्यावर पतका लावल्या जातात, रांगोळी काढली जाते व ढोलताशे,बंँन्जोच्या गजरात पालखी हजारो लोकांच्या साक्षीने भेरीदेव पालखीत बसून येतानाच्या आनंदाला पारावार उरत नाही. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे भैरीदेव देवस्थान जांभारी व ग्रामस्थ यांनी यावर्षीचा शिमगोत्सव साधेपणाने शासनाचे नियम पाळून साजरा करण्याचे ठरविले आहे तरी परिसरातील गावातून येणा-या भाविकांनी या वर्षी शिमगोत्सवास येऊ नये. पाडव्यापर्यंत पालखी मांडावर असल्याने शिमगोत्सव झाल्यानंतर कधीही येऊन आपण दर्शन घ्यावे, असे भैरीदेव देवस्थान जांभारीने कळविले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:12 AM 17-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here