बेपत्ता वृद्धाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला

0

रत्नागिरी : शहरानजीकच्या भाट्ये येथील स्मशानभूमीजवळ कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना रविवारी दुपारी ३.३० वा.सुमारास उघडकीस आली. सुमारे महिनाभर भाट्ये येथूनच बेपत्ता असलेल्या वृद्धाचा तो मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले असून, शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रदीप पांडुरंग हरमले (भाट्ये) असे त्या वृद्धाचे नाव असून याबाबत भाट्ये गावच्या पोलिस पाटील अक्षता इंद्रजित भाटकर यांनी पोलिसांना खबर दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:31 AM 22-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here