दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : DFO शिवकुमार यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

0

अमरावती : धारणी तालुक्यातील हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला २९ मार्चपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास त्याला मोठ्या पोलीस बंदोबस्तात धारणी न्यायालयात आणण्यात आले. यावेळी न्यायालयाबाहेर मोठा जनसमुदाय एकत्र आला होता. लोकांमध्ये असलेला संताप व असंतोष पाहता न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. न्यायालयाबाहेर आरोपी विनोद शिवकुमारला फाशी देण्याची मागणी करत त्याचे छायाचित्र जाळण्यात आले. निदर्शने करण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:50 PM 27-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here