२०२०-२०२१ या आर्थिक वर्ष अखेरचा स्वामी स्वरूपानंद चा संमिश्र व्यवसाय ३८५ कोटी गत वर्षी पेक्षा ३८ कोटींची वाढ : अॅड. दीपक पटवर्धन

0

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा कर्ज व ठेवी मिश्र व्यवसाय ३८५ कोटी झाला असून संस्थेने विक्रमी वसुलीची परंपरा कायम राखत ९९.७५% इतकी वसुली केली. संस्थेने किफायती व्यवहार करत ५ कोटी ७० लाखांचा निव्वळ नफा प्राप्त केला असून गुंतवणुका १०१ कोटी ६९ लाख झाल्या असून ठेवी २२६ कोटी ३० लाख तर कर्ज १५९ कोटी ०९ लाख झाले आहे. सी.डी. रेशो ६२.०१% इतका प्रमाणबद्ध राहिला असून, स्वनिधी २६ कोटी ९५ लाख झाला आहे. ११ शाखांची वसुली १०० % झाली असून ६ शाखा ९९ % च्या पुढे आहे. डिजिटल व्यवहारांचा उपयोग करत संस्थेच्या माध्यमातून ४८ कोटींची रक्कम अन्य खात्यात वर्ग केली ५५२४ खात्यात असे व्यवहार करण्यात आले तसेच २८ कोटी २०८८ खात्याच्या माध्यमातून संस्थेच्या खात्यात जमा झाले. RTGS, NEFT चा उपयोग करत ग्राहकांना सेवा देण्यात आल्या. या आर्थिक वर्षा अखेर संस्थेची सभासद संख्या ३७ हजार झाली असून ठेव खाती ७०५२० झाली तर कर्ज खाती २०९६१ एवढी झाली आहेत. कोव्हिड कालखंड असूनही आपले सर्व व्यवहार नियोजनबद्ध पद्धतीने करून विश्वासार्हता व आर्थिक शिस्त याचा अवलंब करत ठेवीदार तसेच कर्जदार यांचे सहकार्य प्राप्त करत संस्था अग्रस्थानी राहिली आहे. सभासद ग्राहक, कर्मचारी, पिग्मी प्रतिनिधी, सहकारी संचालक या सर्वांच्या सहकार्याने उत्तम आर्थिक रिझल्ट देता आले ही परंपरा अबाधित राखत नवीन वर्षात २७५ कोटीच्या ठेवी, १८० कोटींच कर्ज, किमान ३ नवीन शाखा तसेच डिजिटल व्यवहारांसाठी अधिक तांत्रिक सुविधा हे उद्दीष्ट ठेवत मार्गक्रमण करू असे संस्थेचे अध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:43 PM 03-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here