अनिल देशमुख प्रकरणी सीबीआय च्या तपासाला वेग; अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतील NIA च्या कार्यालयात दाखल

0

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर आता हालचालींना वेग आला आहे. सीबीआयचे एक पथक शुक्रवारी सकाळीच राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA च्या कार्यालयात दाखल झाले आहे. उच्च न्यायालयाने जयश्री पाटील यांच्या याचिकेवर अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा NIA तपास करत आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या एनआयएच्या कोठडीत असून परमबीर सिंह यांनी पत्राच्या माध्यमातून केलेल्या आरोपांत सचिन वाझेंचाही उल्लेख आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सीबीआय एनआयएच्या तपासात समोर आलेली माहिती गोळा करत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:25 PM 09-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here