अनेक लसीकरण केंद्रांमध्ये लसींचा साठा शून्यावर; मुंबईत एक दिवस पुरतील इतक्याच लसी : महापौर

0

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा योग्यरित्या होत नसल्याचा आरोप राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी लसी उपलब्ध नसल्यानं लसीकरण थांबवण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबईतील अनेक केंद्रांमध्ये लसी उपलब्ध नाहीत. तसंच मुंबईत केवळ एक दिवस पुरेल इतका लसींचा साठा उपलब्ध असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. “मुंबईतील काही लसीकरण केंद्रांवर लसीचा साठा शून्यावर आला आहे. त्यामुळे त्या ठिकाणचं लसीकरण थांबवावं लागलं आहे. आज आपल्याकडे ७६ हजार ते १ लाख लसींचे डोस येणार असल्याची माहिती मला माध्यमांकडून समजली आहे. परंतु याबाबत काही अधिकृत माहिती अद्याप मिळाली नाही,” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:46 PM 09-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here