उक्षी येथे अपघात; एक ठार, दोन जण जखमी

0

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील वाद्री उक्षी येथे चारचाकी वाहनांमध्ये झालेल्या धडकेत वाहने दरीत कोसळून एक जण ठार, तर दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी रात्री 9.30 वाजण्याच्या दरम्यान घडला. अरविंद हरिनाथ शर्मा (52, रा. परळ, मुंबई) असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. या अपघातात चालक पांडुरंग पाटील आणि जनार्दन माळकर असे दोघे जण जखमी झाले आहेत. अरविंद शर्मा यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जगताप यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:38 PM 09-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here