कोरोनाला रोखण्यासाठी देशपातळीवर आज महत्त्वपूर्ण बैठक, मोठा निर्णय होण्याची शक्यता

0

नवी दिल्ली : देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रकोपानंतर निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आज पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कोरोना विषयक मंत्रिगटाची बैठक होत आहे. गेल्या दीड वर्षापासून या मंत्रिगटाच्या बैठकीच्या शिफारशींच्या आधारावर देशभरात कोरोनाविरुद्ध कशी लढाई लढायची याचं नियोजन केलं जात आहे. मंत्रिगटाच्या बैठकीच्या पूर्वी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला होता. यामध्ये 100 टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट सर्व राज्यांना देण्यात आलं आहे. मात्र अनेक राज्यांनी लसीच्या साठ्याच्या मुद्द्यावर ओरड केली आहे. याच मुद्द्यावर आजच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सकाळी साडेदहा वाजता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. या बैठकीला केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री, केंद्रीय गृहमंत्री, वाणिज्यमंत्री यांच्यासह केंद्रीय गृहमंत्रालय व केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सर्व ज्येष्ठ सचिव आणि कॅबिनेट सचिव उपस्थित राहणार आहेत. बैठकीमध्ये देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हवाई वाहतूक निर्बंध कसे लागू करावे, यासंदर्भात देखील चर्चा होईल. सोबतच केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्या वतीने कोरोना विषयक नवीन नियोजन आजच्या बैठकीत मांडले जाण्याची शक्यता आहे. सोबतच कोरोनाच्या लसीसाठी आवश्यक असलेला कच्चा माल अनेक देशांनी रोखून धरलेला आहे. त्यामुळे यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने भारत सरकारच्या परराष्ट्रीय धोरणाची माहितीदेखील आजच्या बैठकीत देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संपूर्ण बैठकीच्या आधारावर आगामी काळात कोरोना विषयक लढाई कशी लढायची यासंदर्भात देखील बैठकीत विस्ताराने चर्चा होईल. भारतात जरी आता कोरोनाची दुसरी लाट आली असती तरी जगातील 22 देशांमध्ये कोरोनाची आता तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये देखील चिंताजनक वातावरण तयार झालेले आहे. अशावेळी भारताने जागतिक लसीकरणाच्या मोहिमेत नेतृत्व घेऊन कच्चा मालाच्या बदल्यात परकीय देशांना लसी कशा देता येईल यासंदर्भात देखील परराष्ट्र मंत्रालय मांडणी करण्याची शक्यता आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:12 AM 09-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here