कौतुकास्पद: रत्नागिरीच्या ईशानी पाटणकर ची ‘सूर नवा ध्यास नवा’ मध्ये निवड

0

रत्नागिरी : रत्नागिरीच्या अनेक हरहुन्नरी कलाकारांनी आपल्या कलागुणांनी रत्नागिरीचे नाव लौकिक केले आहे. आता रत्नागिरीची ईशानी पाटणकर ‘सूर नवा ध्यास नवा’ च्या रंगमंचावर रत्नागिरीचा ठसा उमटवणार आहे. रत्नागिरीच्या ईशानी पाटणकर ची सूर नवा ध्यास नवा मध्ये निवड झाली आहे. महाराष्ट्रातील ५५०० स्पर्धकांमधून निवडल्या गेलेल्या १६ स्पर्धकांमध्ये ईशानी ची निवड झाली आहे. ईशानीने उद्योजक किरणजी सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित होणाऱ्या लिटील व्होईस ऑफ रत्नागिरी या स्पर्धेचे पहिले पर्व जिंकले होते. ना. उदय सामंत आणि भैय्या सामंत यांनी रत्नागिरीतील अनेक कलाकारांना रंगमंच उपलब्ध करून दिल्यामुळे त्याचा निश्चितपणे उपयोग होऊन आपले कलाकार मोठ्या स्पर्धेत आपला ठसा उमटवत आहेत. ईशानीच्या या निवडीबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:06 AM 09-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here