”जिल्हा शासकीय रुग्णालय कोरोनाच्या मृतांची आकडेवारी लपवत आहे”

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले कोरोनाबाबतची आकडेवारी लपवून प्रशासनाबरोबरच जनतेचीही दिशाभूल करत आहे. खोटी आकडेवारी प्रसिद्ध करत आहे, असा गंभीर आरोप भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केला आहे. ते म्हणाले, गेल्या ६ एप्रिलला करोनाचे चार जण मरण पावले असताना रुग्णालयातून प्रसिद्धी माध्यमांसाठी दिल्या जाणाऱ्या प्रसिद्धीपत्रकात फक्त दोनच मृत्यू दाखवले गेले. सात तारखेच्या आकडेवारीत दोन दिवसांचे सहा मृत्यू दाखवले गेले. प्रत्यक्षात बुधवारी रत्नागिरी पालिकेने आठ करोना रुग्णांच्या मृतदेहांचे दहन केले. हे दोन नवीन मृतदेह शासकीय रुग्णालयाने पाठवले, ते करोनाचेच मृतदेह होते का, याची माहिती मिळणे आवश्यक आहे. शासकीय रुग्णालयात पुरेसे डॉक्टर, नर्स नसतानाही शल्यचिकित्सक डॉ. फुले सरकारला खोटी माहिती देत असल्याचा आरोपही अनिकेत पटवर्धन यांनी केला आहे

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:04 PM 09-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here