देशात 24 तासात 36 लाख जणांचे लसीकरण

0

नवी दिल्ली : देशात कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या देण्यात आलेल्या एकूण मात्रांनी आज 9.43 कोटीचा टप्पा पार केला. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार भारतात 14,28,500 सत्राद्वारे 9,43,34,262 लसीच्या मात्रा देण्यात आल्या. लसीकरण अभियानाच्या 83 व्या दिवशी 8 एप्रिल रोजी लसीच्या 36,91,511 मात्रा देण्यात आल्या.  49,416 सत्राद्वारे 32,85,004 लाभार्थींना पहिली मात्रा आणि 4,06,507 लाभार्थींना दुसरी मात्रा देण्यात आली. जागतिक स्तरावर दैनंदिन मात्रांचे प्रमाण लक्षात घेता भारत दर दिवशी सरासरी 37,94,328 मात्रा देत असून अद्यापही सर्वोच्च स्थानावर आहे. भारतात दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ जारी आहे.गेल्या 24 तासात 1,31,968 नव्या रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या वाढती असून नव्या रुग्णांपैकी 83.29 टक्के रुग्ण या 10 राज्यात आहेत. भारतात आज उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 9,79,608 आहे. ही देशातल्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 7.50 टक्के आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:07 PM 09-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here