पहिला स्वातंत्र्यदिन पाहिलेल्या देवरुखे ज्ञातिबांधवांना आवाहन

0

रत्नागिरी : ज्यांनी पहिला स्वातंत्र्य दिवस म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस पाहिला असेल, अशा देवरुखे ब्राह्मण समाजातील हयात व्यक्तींनी त्यांच्या त्या दिवसाबद्दलच्या आठवणींवर आधारित लेख लिहून पाठविण्याचे आवाहन अंजली मराठे यांनी केले आहे. या आठवणी संकलित केल्या जाणार आहेत. आठवणीतला पहिला स्वातंत्र्यदिन पाहणाऱ्या देवरुखे ज्ञातीतील व्यक्तीचे नाव (महिला असल्यास माहेरचे आणि सासरचे पूर्ण नाव), जन्म तारीख, जन्म ठिकाण, शिक्षण कोठे झाले, शाळेचे नाव, शिक्षण आपल्या गावात, शहरात झाले की, शिक्षणासाठी बाहेर किंवा नातेवाईकांकडे राहावे लागले, १५ ऑगस्ट १९४७ रोजी वय किती होते, कोणत्या इयत्तेत शिक्षण सुरू होते, आपण इंग्रजांच्या गुलामगिरी तून मुक्त झालो. देशाला स्वातंत्र्य मिळाले, म्हणजे नक्की काय झाले हे त्या वयात समजले होते का, शिक्षकांनी शाळेत समजावून सांगितले की घरातील वडीलधाऱ्या माणसांनी सांगितले, शाळेत स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला होता का, गावात, शहरात कसे वातावरण होते, प्रभात फेरी, दारोदारी रांगोळ्या, गुढ्या-तोरणे उभारली होती का, घरात कसे वातावरण होते, पंडित नेहरू यांनी देशाला उद्देशून आकाशवाणीवरून केलेले भाषण ऐकले होते का, ते आठवते का, पहिला स्वातंत्र्यदिन, स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव आणि आता अमृत महोत्सव पाहताना मनात नेमक्या कोणत्या भावना येतात, आणखी काही सांगावे असे वाटते का, पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या आठवणी मुलांना, नातवंडांना सांगितल्या का, प्रभातफेरीचे एखादे गाणे आठवत असेल तर त्याच्या काही ओळी सांगता येतील का, या मुद्द्यांच्या आधारे माहिती पाठवायची आहे. पहिला स्वातंत्र्य दिन पाहिलेल्या सर्व व्यक्तींनी माहिती पाठवावी. ज्यांना लिहिणे, टाइप करणे शक्य नसेल त्यांनी कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य घेऊन आठवणींचा अमूल्य ठेवा जपण्यात हातभार लावावा, असे आवाहन सौ. अंजली आशुतोष मराठे (पूर्वाश्रमीच्या अंजली श्रीपाद मुळे) यांनी केले आहे. आपल्या आठवणी ९७२५०२२५१० या व्हॉट्स अॅप क्रमांकावर पाठवाव्यात, असे सूचित करण्यात आले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:51 PM 09-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here