मुहूर्ताच्या हंगामात सराफ व्यवसायावर लॉकडाऊनचे संकट : प्रमोद खेडेकर, व्यापारी महासंघ पदाधिकारी

0

🔳 नियमावलीचा पुनर्विचार करून लवकरात लवकर दुकाने उघडण्यास परवानगी द्या

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी : विवाह सोहळे व इतर मुहूर्त सराफ व्यवसायिकांसाठी पर्वणी असते. पाडव्याच्याच मुहूर्तावर रत्नागिरी शहरात सुमारे तीन कोटींची उलाढाल होते. अशा मुहूर्तावर होणाऱ्या व्यवसायावर आमचा वर्षाचा व्यवहार अवलंबून असतो. मार्च, एप्रिल, मे हे तीन महिने हंगामाचे असतात. मात्र मागील वर्षांपासून कोरोना मुळे आमचा व्यवसाय ठप्प झालाय अशी चिंता रत्नागिरी व्यापारी महासंघाचे पदाधिकारी सराफ व्यावसायिक प्रमोद खेडेकर यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने जारी केलेल्या नियमावलीमुळे आज आमचा व्यवसाय बंद असल्याने सराफ व्यवसायिकांसह व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. सोन्याच्या वाढत जाणाऱ्या दरामुळे आमच्या स्टॉक वरील कराची रक्कम देखील वाढत आहे, ती भरणे देखील अडचणीचे होणार आहे. सलग इतके दिवस दुकान बंद राहिल्याने आमचे मोठे नुकसान झाले आहे. तरी सरकारला ही विनंती आहे की लवकरात लवकर लॉकडाऊनमधून सवलत द्यावी व आमच्या सराफ व्यवसायाला आधार द्यावा असे आवाहन रत्नागिरी शहर व्यापारी महासंघातील सराफ प्रतिनिधी प्रमोद खेडेकर यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:34 PM 09-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here