राज्यात लॉकडाऊन लावण्याविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे मोठे विधान, म्हणाले…

0

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे राज्याला कोरोना लसींचा तुटवडा भासत आहे. विकेंड लॉकडाऊनसह अन्य दिवशी कडक निर्बंध लावून राज्य सरकार ही स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न देखील करत आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. दरम्यान, विजय वडेट्टीवार यांच्या या संकेतांनंतर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही लॉकडाउनसंबंधी मोठे विधान केले आहे. राज्यातील लॉकडाऊनबाबत बोलताना राजेश टोपे म्हणतात की, ‘जर राज्यातील कोरोना परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर महाराष्ट्र लॉकडानच्या दिशेने वाटलाच करेल.आपण लॉकडाउनच्या दिशेने वाटचाल करत आहोत. पण तो करावा लागू नये अशीच अपेक्षा आहे. जर त्याआधी आपण कोरोनास्थितीवर नियंत्रण मिळवले तर आम्ही आनंदी आणि समाधानी असू. मात्र, स्थिती तशीच राहिली तर आपली वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने होईल’, असे राजेश टोपेंनी सांगितले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

राजेश टोपे त्यापुढे बोलताना असे म्हणाले की, ‘आम्ही लॉकडाऊन करण्याचे समर्थन करत नाही. मात्र, जेव्हा रुग्णालयांमध्ये गर्दी होते, डॉक्टर-नर्सेसचा, औषधांचा तुटवडा निर्माण होतो, दररोज वाढणाऱ्या मोठ्या रुग्णसंख्येचा सामना करण्यास आपण असक्षम असतो तेव्हा तात्काळ लॉकडाउन जाहीर करणे हा नियम आहे. जेणेकरुन या वेळात आपण सुविधा उभा करुन परिस्थितीचा सामना करु शकतो.’

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:55 PM 09-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here