शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी मित्रांसाठी दोन महिने मोफत वाचनालय सुविधा : अॅड. दीपक पटवर्धन

0

रत्नागिरी : रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयामध्ये 15 एप्रिल ते 15 जून या दोन महिन्यांमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचनालय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. लॉकडाऊन कालावधीमध्ये शालेय व महाविद्यालयीन कामकाज बंद असताना वाचनालयांचा लाभ घेत भरपूर वाचन विद्यार्थीवर्गाने करावे म्हणून दोन महिने मोफत वाचनालय सुविधा उपलब्ध करण्यात येत असल्याचे वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

◼️ पुस्तक घरी नेऊन वाचता येणार
मोफत वाचनालय सुविधेमध्ये एक पुस्तक घरी घेऊन जाऊन वाचता येण्याची सुविधा देण्यात आली आहे. वाचनालयात येऊन वाचनालयाचे अर्ज भरून, तसेच आय-कार्डची झेरॉक्स व मूळ प्रत, पालकाचे आधार कार्ड तसेच एका त्रयस्थ मान्यवर व्यक्तीचे शिफारस पत्र व 300 रुपये डिपॉझिट (जे दि. 15 जून रोजी पुस्तक जमा करून परत मिळेल) या पूर्तता करून या सुविधेचा लाभ विद्यार्थी घेऊ शकतात.

◼️ विपुल व विविधता असलेले ग्रंथ
वाचनालयामध्ये विपुल आणि विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. पुस्तकांचे वाचन करण्याची संधी विद्यार्थ्यांनी घ्यावी. अनेक चरित्रे, प्रवासवर्णने, ऐतिहासिक कादंबऱ्या, ललितलेख, कथा संग्रह, भयकथा, शौर्य कथा, कविता संग्रह, तसेच स्वामी, श्रीमान योगी, छावा, पु.ल. देशपांडे यांचे साहित्य हॅरी पॉटर, जेम्स बॉण्ड यांची पुस्तके अशी अनेक प्रकारची नवी जुनी पुस्तके वाचनालयात उपलब्ध आहेत. या पुस्तकांचा आस्वाद विद्यार्थ्यांनी घ्यावा यासाठी मोफत वाचन सुविधा उपलब्ध केली आहे असे अॅड. पटवर्धन म्हणाले.

◼️ सर्वात जुने सर्वात अद्ययावत वाचनालय
महाराष्ट्रातले सर्वात जुने म्हणजे 193 वर्षाचे हे वाचनालय आपल्या रत्नागिरीत आहे आणि प्रचंड ग्रंथ खजिना अनेक दुर्मिळ पुस्तके विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

◼️ वाचनालय सकाळी 9 ते दुपारी 12:30 व सायंकाळी 3.30 ते 7:15 या वेळेत रविवार सोडून वाचकांसाठी सुरू असते. विद्यार्थ्यांनी वाचनालयाच्या या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा.

◼️ पालकांनी पाल्यांना उद्युक्त करावे
पालकांनीही जागृतपणे विद्यार्थ्यांना रत्नागिरीतील या वाचन मंदिरात जाण्यासाठी उद्युक्त करावे असे आवाहन रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:33 PM 09-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here